Wednesday, February 24, 2010

आठवणी मनातल्या १- आजीचे घर!


आत्ता ऑफिस मध्ये बसल्या बसल्या मोगऱ्याच्या फुलांचा वास आला.आणि लहानपणी आजीच्या घरातला मोगऱ्याच्या वास आठवला :)दर अष्टमी - पौर्णिमेला आजीच्या घरी देवीची आरती असे. आणि त्यासाठी जाईचे हार मोगऱ्याचे गजरे आणले जायचे.आरतीच्या आधी त्या फुलांच्या सुगंधाने सगळे घर भरून जायचे.किती प्रसन्ना वाटायचे सगळे :)
आजोबा देवघराची दिव्याची माळ लावायचे, देवीला नवीन वस्त्र घालायचे.जे ते स्वतः शिवत. मग फुला वाहायचे, समई लावायचे, उदबत्ती लावायचे आणि सगळा वातावरण प्रसन्ना व्हायचे.खूप आवडायचे ते सगळे मला !
ती प्रसन्ना हसणारी देवीची मूर्ती, कितीतरी वेळा मला धीर देऊन गेलीये. आणि आजी आजोबांच्या त्याच पुण्यायीमुळे , त्या प्रसन्नतेमुळे त्यावेळी आयुष्याला चांगले वळण लागले :)
घराबाहेर जाताना देवाला नमस्कार करून जाणे, किती छोटीशी गोष्ट वाटते, पण त्यामागची भावना , अर्थ किती छान होता हे आत्ता जाणवते.
आरतीच्या निमित्ताने सगळे एकत्र जमायचे.आई, मामा, कधीतरी मावश्या, त्यांची मुला. सगळे घर भरून जायचे :) आम्हा लहान मुलांसाठी ती एक पर्वणीच असायची ! खूप खेळायचे आणि मोठ्यांकडून लाड करून घ्यायचे :)
रोज सकाळी अंगणात सडा घालून रांगोळी काढायची सवय आजीनेच लावली. तो मातीचा गंध, मनापासून काढलेली रांगोळी, कुणीतरी तिचं केलेला कौतुक :)


आजीच्या वाड्यातला सदाबहार पारिजात ..त्याची टप टप पडणारी फुला, आणि फुला वेचणारी आम्ही मुला :) ...आजोबांनी शिकवलेले पारिजातकाचे हार ,रात्री वाड्यातल्या ओट्यावर बसून पाहिलेला चांदण्यात फुललेला पारिजात !!

वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांमधील माणसांचे अनौपचारिक बोलणे , वागणे, कुणालाही कुणाच्याही घरात थेट प्रवेश !!!
याच सर्व गोष्टींसाठी आम्ही नेहेमी आजोळी जाण्यासाठी आईकडे केलेला हट्ट :) किती छान होते ते सगळे !!

कॉलेजसाठी म्हणून बाहेर पडले आणि कुठेतरी हे सगळा हरवत गेलं.

आता माझे सासर देवपूजा करणारे :) इथे खूपशा गोष्टी मला परत मिळाल्या :)
माझ्या माहेरची गणपती -महालक्ष्मी , नवरात्र ,सगळे सण :) आजीकडची नवरात्रीची आरती सासरीही सगळ्यांना आवडली तेव्हा मला खूप छान वाटले. माझे सासूबाई आणि सासरे मनापासून या सगळ्या गोष्टी जपतात :)
मी पण ते जपायचा प्रयत्न करेन. कारण एकदा हरवले कि ते परत मिळणार नाही.मला जे मिळाले ते माझ्या मुलाला पण अनुभवता यावे , जाणवावे. खोल खोल कुठेतरी ती प्रसन्नता त्याच्यात पण झिरपावी :)

2 comments:

  1. प्राज.. खुप छान लिहिले आहेस ... नवरात्रीतले वातावरण डोळ्यांसमोर त्यांच्या रंग,गंध आणि आरतीच्या गोडव्या सकट मनात उभे राहिले... आपण खरच खूप नशिबवान आहोत ...निस्सीम आनंद देणारी प्रार्थना आणि सण उत्सव आपण अनुभवले आहेत... आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत बदलत गेलेले जगही.... निखळ आनंद देणार्‍या संस्कारांचे लेणे आपल्याला लाभले आहे.. आणि ते प्रयत्नपूर्वक जपण्याची आणि पुढच्या पिढीकडे त्यांच्या भाषेत त्याना कळेल असे सूपुर्द करण्याचा तुझा विचार खुपच आवडला.. तुला लिहिण्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा .. आणि लवकरच पुढच्या आठवणी आणि त्यातून खूप सारे रांग बरसु देत..:)
    -मेधा

    ReplyDelete
  2. ya blog chya madhyamatun tuzya madhye dadaleli bhavuk likhika amhala janawali :)
    kharach khup chan lihites dear...mazyahi balapanichya athawani tajya zalya :)... tuze blog wachun mala pan lihavese watat ahe pan suruvat kashi karavi tech kalat nahiye...:D

    ReplyDelete