Wednesday, February 24, 2010

आठवणी मनातल्या १- आजीचे घर!


आत्ता ऑफिस मध्ये बसल्या बसल्या मोगऱ्याच्या फुलांचा वास आला.आणि लहानपणी आजीच्या घरातला मोगऱ्याच्या वास आठवला :)दर अष्टमी - पौर्णिमेला आजीच्या घरी देवीची आरती असे. आणि त्यासाठी जाईचे हार मोगऱ्याचे गजरे आणले जायचे.आरतीच्या आधी त्या फुलांच्या सुगंधाने सगळे घर भरून जायचे.किती प्रसन्ना वाटायचे सगळे :)
आजोबा देवघराची दिव्याची माळ लावायचे, देवीला नवीन वस्त्र घालायचे.जे ते स्वतः शिवत. मग फुला वाहायचे, समई लावायचे, उदबत्ती लावायचे आणि सगळा वातावरण प्रसन्ना व्हायचे.खूप आवडायचे ते सगळे मला !
ती प्रसन्ना हसणारी देवीची मूर्ती, कितीतरी वेळा मला धीर देऊन गेलीये. आणि आजी आजोबांच्या त्याच पुण्यायीमुळे , त्या प्रसन्नतेमुळे त्यावेळी आयुष्याला चांगले वळण लागले :)
घराबाहेर जाताना देवाला नमस्कार करून जाणे, किती छोटीशी गोष्ट वाटते, पण त्यामागची भावना , अर्थ किती छान होता हे आत्ता जाणवते.
आरतीच्या निमित्ताने सगळे एकत्र जमायचे.आई, मामा, कधीतरी मावश्या, त्यांची मुला. सगळे घर भरून जायचे :) आम्हा लहान मुलांसाठी ती एक पर्वणीच असायची ! खूप खेळायचे आणि मोठ्यांकडून लाड करून घ्यायचे :)
रोज सकाळी अंगणात सडा घालून रांगोळी काढायची सवय आजीनेच लावली. तो मातीचा गंध, मनापासून काढलेली रांगोळी, कुणीतरी तिचं केलेला कौतुक :)


आजीच्या वाड्यातला सदाबहार पारिजात ..त्याची टप टप पडणारी फुला, आणि फुला वेचणारी आम्ही मुला :) ...आजोबांनी शिकवलेले पारिजातकाचे हार ,रात्री वाड्यातल्या ओट्यावर बसून पाहिलेला चांदण्यात फुललेला पारिजात !!

वाड्यात राहणाऱ्या कुटुंबांमधील माणसांचे अनौपचारिक बोलणे , वागणे, कुणालाही कुणाच्याही घरात थेट प्रवेश !!!
याच सर्व गोष्टींसाठी आम्ही नेहेमी आजोळी जाण्यासाठी आईकडे केलेला हट्ट :) किती छान होते ते सगळे !!

कॉलेजसाठी म्हणून बाहेर पडले आणि कुठेतरी हे सगळा हरवत गेलं.

आता माझे सासर देवपूजा करणारे :) इथे खूपशा गोष्टी मला परत मिळाल्या :)
माझ्या माहेरची गणपती -महालक्ष्मी , नवरात्र ,सगळे सण :) आजीकडची नवरात्रीची आरती सासरीही सगळ्यांना आवडली तेव्हा मला खूप छान वाटले. माझे सासूबाई आणि सासरे मनापासून या सगळ्या गोष्टी जपतात :)
मी पण ते जपायचा प्रयत्न करेन. कारण एकदा हरवले कि ते परत मिळणार नाही.मला जे मिळाले ते माझ्या मुलाला पण अनुभवता यावे , जाणवावे. खोल खोल कुठेतरी ती प्रसन्नता त्याच्यात पण झिरपावी :)