Wednesday, May 19, 2010

I Love my cycle :)

लहानपणी आकर्षण वाटणारी सायकल! थोडे मोठे झाल्यावर शाळेत जायला हातात मिळाली :) मोठ्या बहिणीची ATLAS सायकल!आजीच्या वाड्यातल्या मैत्रिणीने, दीप्तीने सायकल चालवायला शिकवली :) शिकताना आधी नुसताच एक पाय paddle वर आणि दुसरा पाय जमिनीवर, मग हळूच दुसराही पाय paddle वर टाकून अर्धे paddle मारत तोल सांभाळणे, कधीतरी पहिल्यांदा धाडस करून मारलेला पहिला पूर्ण paddle , मग धिटाई वाढून आधी अंगणात आणि मग रस्त्याच्या कडेने मारलेल्या चकरा!! कधी धड्पले तरी उठून परत सायकल शिकायची उर्मी, मग लहान बहिणीला मागे बसवून " double seat " , शाळेत जाताना मैत्रिणींबरोबर लावलेली सायकल शर्यत !!...कित्ती आठवणी सायकलच्या :)

कॉलेजला गेल्यापासून scooty ,activa भुरळ घालायला लागल्या, मोठ्या शहरात घर आणि college अंतर मोठे, मग सायकल मागेच पडली. कधी आठवण पण नाही आली तिची :(

लग्नानंतर अहोंच्या वाढदिवसाला surprise गिफ्ट म्हणून ६ गेअर्स ची सायकल दिली :)घरात सायकल नव्हती. मग शेंडेफळ असल्यासारखा तिचा कौतुक वाटत राहिलं :) पण ते तेवढ्यापुरताच :( रोजच्या धावपळीत नंतर ती धूळ खात पडली:(
जवळ जवळ ३-४ वर्षांनी थोडा व्यायाम तरी होईल म्हणून तिला दुकानात नेऊन ठीक ठाक करून आणलं.आणि एका सकाळी मस्तं सायकल वर स्वार होऊन फिरायला गेले!! चढावरून जाताना दमछाक झाली पण तो आनंद वेगळाच होता :) जाताना दमछाक होणे, येताना उतारावरून paddle नं मारता सुर्र्रर्रर्र्र्र करत येणे, गार गार वारा, तोही कुठलेही प्रदूषण नं करता, पेट्रोल नं जाळता आणि CALARIES जाळता जाळता :)

परवा एक छान गोष्टं दिसली. आई बाबा २ सायकल वर २ बाजूंनी आणि त्यांची छोटीशी मुलगी छोट्याश्या सायकल वर त्यांच्या मधून मजेत फिरायला चालले होते :)

आता मी आठवड्यातून २-३ वेळा तरी सायकल वर फिरायला जाते सकाळी :) माझा हा उत्साह असाच टिकेल असा आता मलाच विश्वास वाटतोय. म्हणून लिहायचा धाडस केलं :)माझ्यासारखी थोड्या फार फरकाने प्रत्येकाचीच सायकल गोष्टं असणार. पण हे वाचून कुणाला सायकल चालवायची इच्छा झाली तर JOIN ME :)

फिरायला जाण्याव्यतिरिक्त जवळची कामं करायला सायकल वापरली तर प्रदूषणात आणि तब्येतीत किती फरक पडेल ;-? मी हे अजून सुरु केले नाहीये. केल्यावर कळवेनच :)
तूर्तास "चला सायकलस्वार व्हा :)"

2 comments:

  1. हे.. अगदी माझ्या पण खास सायकल-आठवणी जाग्या केल्यास :) मी पण पहिली-दुसरी मधे होते तेव्हा जरा मोठ्या ताया म्हणजे पाचवी पर्य़ंत च्या सायकल चालवायच्या ... मस्त केस उडवत .. खिदळत जायच्या....त्यांचा प्रचंड हेवा वाटायचा मला.. आमची होती BSA..जरा उंचच असते ना ती ..आणि मी पडायचे पिटकी ..मग कधीतरी तिच्या handle पर्य़ंत पोचायला लागले ..:) मोठ्या उत्सहाने घेतली हातात ...पण हाय रे देवा.. ब्यलन्स-बिलन्स प्रकरण एवढे कठिण असते हे कळल्यावर.. माझी झुम-झुम उडत जायची .. माझ्या छोटुश्या भावाला (भाव खात :P ) बालवाडीत सोडण्याची स्वप्न धुळीला मिळायला लागली.. पण अमुक-अमुक मैत्रिणीला सायकल यायला लागली अश्या international news यायला लागल्या सारख्याच ...मग चंगच बांधला.. आई च्या पाठी लागून लागून शिकले बाई एकदाची.. पहिल्यांदा एकटीने balance करता येतो आहे हा कित्ती अफ़लातून आनंद असतो.. त्याची तुलना कश्शाशी नाही होवू शकत :) उंचीमूळे कित्तीतरी दिवस मी half -paddle करतच चालवायचे .. आणि मग अजून उंची वाढल्यावर चक्क seat वर बसता यायला लागले.. हे सगळे आठवले की आता वाटतेय सायकल च्या जोडीनेच मोठे झाले आहोत आपण.. :) hehe ....
    wowwwwwww..तुझा हा Cute आणि inspiring लेख वाचून मी एकदम हवेवरच स्वार झाले की :) छानच लिहिला आहेस एकदम...चल मी येते परत आणि तुला जोइन होतेय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य :D

    ReplyDelete
  2. तुझे Post आणि मग खाली माझ्या एवढाल्या comments पाहून लोक एकदम वैतागत असणार ..पण क्या करे control ही नाही होता ;)

    ReplyDelete