Thursday, May 6, 2010

मंतरलेल्या गोष्टी! -"नटरंग"



तसे "नटरंग" प्रदर्शित होऊन बरेच दिवस झालेत. त्याचे समीक्षण वगैरे इथे लिह्याचा मानस नाहीये. मी आणि "अहों"नी खास "प्रभात" ला जाऊन पहिला होता हा सिनेमा :)कारण मराठी म्हणजे "प्रभात" हे समीकरण आजचे multiplex अजूनही मोडू शकले नाहीयेत :) सिनेमा पाहिल्यावर आम्ही दोघेही सारखेच वेडे झालो होतो!! त्यातली कथा, जरा हटके "नच्याचे" काम करणारा गुणा, सगळेच कलाकार आणि अप्रतिम संगीत!!! नंतर आम्ही परत आपापल्या कामात गुंतून गेलो. परवा ऑफिसमध्ये सहज एकाकडून mobile वर ऐकायला "नटरंग" ची गाणी मिळाली :) मी जाम खुश झाले !!! मग काय बस मधून जाता येता माझी पारायणं सुरु झाली :) प्रत्येक गाणं किती वेळा ऐकू असं प्रत्येक वेळी होतंय :) मंतरलेलं मंतरलेलं म्हणतात ते हेच असता का ? लगेच इंटरनेट वर "मेकिंग ऑफ नटरंग" शोधून काढलं. त्या कलावंतांचे अगदी स्पॉट बॉय पासून सगळ्यांचे अनेक क्षण टिपलेले फोटो पाहायला मिळाले :)
हा चित्रपट करायचा हे कुणी ठरवलं असेल तो क्षण आणि रसिकांनी त्याला HOUSE FULL करून टाकण्याचे यश...यामध्ये किती कष्ट घेतले असतील आख्ख्या टीम ने !!कसली धुंदी असेल प्रत्येकावर यात काम करताना? प्रत्येकाच्या कामाचा भाग जोडून एक सुंदर collage कसा तयार झाला असेल? आम्ही college मध्ये छोटी छोटी नाटकं, dances बसवायचो तेव्हा सगळेजण एका भारावलेल्या स्थितीत असायचे. तसंच यांचाही झाल असेल का?

अजय अतुल जोडीने अतुलनीय दिलेलं संगीत एखाद्यावर इतकी जादू करू शकतं?? त्यातला प्रत्येक शब्द, music piece , गाण्याच्या चाली, खूप मेहनत घेऊन विशिष्ट ग्रामीण पद्धतीने गायलेला प्रत्येक शब्द मंत्रमुग्ध करून टाकतात!!
"नटरंग उभा " मध्ये chorus चे किती कौतुक करावे तेवढे कमीच. कलावंताबद्दल किती आदर वाटतो हे गाणं ऐकताना!! देवाला आणि रसिकांना त्यांची "किरपा" मिळवण्यासाठी केलेली आर्जव मनाला भिडते !

"खेळ मांडला" मधली आर्तता अवर्णनीय आहे!!

"अप्सरा आली " मधला शृंगार बेधुंद करणारा आहे!! हे गाणं ऐकताना आपलंच मन घुंगरू बांधून नाचायला लागते :)

" आता वाजले की बारा" - उडत्या चालीने सगळ्यांना वेड लावून जातं :)

एक अप्रतिम कलाकृती !!! एक मंतरलेली गोष्टं!!! आणि काय लिहू?

PLease visit the link:
http://en.wikipedia.org/wiki/Natarang

1 comment:

  1. खरच ग..:) हा चित्रपट पाहून आमची पण एकदम ’मंतरलेले’ अशीच भारली अवस्था झाली होती...अतुल कुलकर्णी चा अभिनय तर खूपच लाजवाब... मर्दानी-राजबिंडा असलेल्या गुणा चे केवळ कलेसाठी झालेले नाच्यामधले रुपांतर काळजाला जिव्हारीच लागते.. नाट्य, आभिनय, संहिता सगळ्याच द्रुष्टी ने द्रुष्ट लागावा असा सगळा मेळ जमून आलेला आहे.. पण सगळ्यात वरकढी करते ते अजय-अतुल चे वेड लावणारे संगीत..गाण्यातला प्रत्येक क्षण एक अद्भुत अनुभूती देतो... ’तमाशा-संगीत’ हा आजच्य modern समाजाने जरा बाजुलाच ठेवलेला प्रकार त्यांनी आपल्या आगळ्या पद्धतीने सामोरा आणलाय ....really hats off to them :)
    गुरु ठाकूर ची लेखणी तर इतकी देखणी होवून बरसलीये की नकळत आपणच त्या गाण्यांचा एक भाग होवून जगू लागतो... :)
    आणि खरचं ग आपण college मधे छोटे-छोटे काय काय करताना कित्ती भारवलेले असायचो ते आठवले आणि हे भले-मोठे ईद्रधनुष्य लिलया पेलताना.. सगळ्यांचे जमलेले सूर आणि अशी अवीट कलाक्रुती निर्माण करतानाचा तल्लीन आणि स्वर्गीय आनंद याची कल्पना करुनच येवढे छान वाटते आहे..
    आता बास करते कारण वेडेपणाला अंत नसतो :) आणि comments टाकतेय का प्रतिपोष्ट असे व्हायचे.. :p

    ReplyDelete