Thursday, April 29, 2010

पहिला पाउस !!!



रोज सकाळी झोपेत ६.३० चा गजर बंद करणारी मी आज कुठल्याश्या मंद मंद सुवासाने क्षणात जागी झाले :)खिडकीतून गार गार हवेबरोबर मातीचा गंध हलकेच आत शिरला होता :) पहाटेच हलकासा पाऊस अंगणात सडा घालून गेला होता !! मन थोडा खट्टू झाला की आज पण मी त्याला miss केलं :( एवढ्यात तो मी office मध्ये असले की घरी बरसून जात होता किंवा गावाच्या दुसऱ्या भागात बरसून गेल्याच्या वार्ता येत होत्या.पण बाहेरचे थंड वातावरण, अजूनही मागे रेंगाळलेले ढग, आणि त्यामागे दडून बसलेला सूर्य, मातीचा वास मला परत झोपू देईनात ;) चक्कं उठले आणि एक फेरफटका मारून आले :) बाहेरचे रस्ते, झाडं आज अभ्यंगस्नान करून प्रसन्न पणे वारयावर झुलत होती. सगळं काही ताजं तवानं वाटत होतं. आज शुक्रवार त्यातून माझे आवडते वातावरण!! पटकन तयार होत होते आणि बाहेर "टप टप टप टप" आवाज करत पाऊस मला भेटायला आला :)
खिडकीपाशी पळत जाऊन त्याला Hi ! केले :) आईंनी आणलेली सोनचाफ्याची फुले खिडकी ठेवून दिली. मग काय, मातीच्या सुवासात सोनचाफ्याचा मंद मंद सुवास सामील झाला :)
मस्तं मूड मध्ये ऑफिसला जायला निघाले. आणि आज चक्कं radio mirchi ने पण "३ गाने back to back" माझ्या आवडीची लावली :) हिंजवडी मधली बोगनवेल आज जास्तीच खुदू खुदू हसत होती :)

तर असा हा माझ्यासाठीचा पहिला पाउस माझा Friday "Special " करून गेलाय :)
आता नुकतीच सूर्याची किरणं ढगांची गर्दी बाजूला सारत आमच्यापर्यंत पोहोचली आहेत आणि मला "काम कर" असे सांगत आहेत :)

2 comments:

  1. सहीच :) पाऊस म्हणजे कित्ती गंमत आणि पूर्ण वेड लावणारे रसायन असते ना.. तिकडचा पाऊस चक्क ब्लोग मधून उतरून इथे पण बरसायला लागला बघ.. :D
    इथे पण काल संध्याकाळपासून पावसाची मंगत चालू आहे.. :)
    आणि तुझी पाऊस,सोनचाफ़ा,आवडती गाणी असे जमून आलेले सूर ही मस्तच ग.. :) मातीच्या सुवासात सोनचाफ्याचा मंद मंद सुवास .. मला तर कल्पनेनेच mad व्हायला होतय बघ....

    गारवामधली सौमित्रची कविता आपसूक ओठी येते आहे...

    पहिला पाऊस पहिली आठवण
    पहिलं घरटं पहिलं अंगण
    पहिली माती पहिला गंध
    पहिलं आभाळ पहिलं रान
    पहिल्या झोळीत पहिलच पान
    पहिले तळहाथ पहिलं प्रेम
    पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
    पहिला पाऊस पहिलीच आठवण
    पहिल्या घराचं पहिलच अंगण

    ReplyDelete
  2. तुझी पोस्ट वाचुन मला खुप छान वाटल, विचार करुन की मी परत येइन त्यानंतर तिथे पाउस असणार. :-) सगळ हिरव, ओल आणि मदमस्त. आपले ताण विसरवणार. :)

    ReplyDelete